#corona

मृत्युला समोर पाहुन सुरू झालेल्या मानवी मनाच्या द्वंद्वाबद्दल माझं मत मी तत्वज्ञानाच्या माध्यमातुन मांडण्याचा हा वेडसर प्रयत्न करत आहे. तसा मी सुद्धा तुमच्यासारखाच सर्वसामान्य मनुष्य आणि मलाही तत्वज्ञानाची बाराखडीही येत नाही पण जसं आपण लहानपणी एकएक शब्द गिरवायला हळूहळू शिकलो तशी सुरुवात कधीतरी करावी म्हणुन आजचे हे लिखाण.

पुण्याची लोकसंख्या जवळपास ३८ लाख (२०२०) आहे पण बाहेरुन शिक्षणासाठी व जगायला आलेल्या लोकांनी मिळवून ती ६५ लाखाच्या घरात जाते. यांतील १०-२० लोक कोरोनो व्हायरसमुळे बाधित झालेत म्हणजे ०.०००१५ ते ०.०००३० टक्के लोक या विषाणुने बाधित झालेत. ( तो अधिक पसरु नये म्हणुन योग्य ती काळजी घ्यावी त्यासाठी WHO आणि वैद्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करावं)

पण मग प्रश्न उद्भवतो की आज पर्यंत मनुष्याने मृत्यु पाहिला नव्हता का ? Ebola सारख्या व्हायरस ने लोक मृत्युमुखी पडताना ही भिती कुठे होती ? हो माणसाने हे सर्व पाहिलंय खर, पण आजपर्यंत स्वतःवर कधी वेळ आली नव्हती. आपणही या विषाणुंचा शिकार होऊ शकतो हे जेव्हा त्याला कळायला लागलं तेव्हा त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात नकळत का होईना मृत्यू आपल्या भयाचं अस्तित्व निर्माण करू लागलं.

या मृत्युच्या भयापुढे त्याला आतापर्यंत आयुष्यात वाटणारी भयं सगळी क्षुद्र वाटु लागली. कधीकळी परीक्षाच सर्वकाही आहे म्हणणारे पालक म्हणु लागले की काय करायचाय त्या परीक्षांच आधी पुणे सोड. एरवी गजबजलेलं पुणे आता ओसाड दिसु लागलं.

खरच मानवी मन हे अजब रसायन आहे ना. माणुस जन्माला आल्यावर त्याच्या आयुष्यात न चुकतां घडणारी गोष्ट म्हणजे मृत्यु. तरी माणसाने मृत्युलाच एवढे घाबरावे 😂.

Steve Jobs च्या शब्दात सांगायचं झालं तर मग असं म्हणतां येईल की

No one wants to die. Even people who want to go to heaven don’t want to die to get there. And yet death is the destination we all share.

मृत्युबद्दल लिहिण्यामागचं कारण या खालील हिंदी ओळीमध्ये सामावले आहे

“जिंदगी जिने की चीज है जनाब काटणे की नही”

तर मग आज मृत्युला समोर ठेवुन स्वताला एक प्रश्न विचारा की “If today were the last day of my life, would I want to do what I am about to do today?”(Steve Jobs).

पटलं तर share करा.

धन्यवाद 🙏❤️

Follow me on Instagram

Leave a comment